सांगली

सांगली : टेंभू योजनेच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

अविनाश सुतार

विटा : पुढारी वृत्तसेवा : ऐन उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यातील माहुली (ता. खानापूर) येथील टेंभू योजनेच्या पंपगृहाशेजारील व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

माहुली (ता. खानापूर) येथे टेंभू उपसा जल सिंचन प्रकल्पाचा टप्पा क्रमांक ३ आहे. या ठिकाणी पंपगृह असून तिथून आटपाडी मुख्य कालवा आणि तासगाव कालव्याकडे पाणी सोडण्यात येते. आज माहुली येथील पंपगृहाच्या एका जलवाहिन्यांवरील एअर व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाण्याचा फवारा वर उडून अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टेंभू प्रशासनाने तातडीने एअर व्हॉल्व दुरुस्त करून पाणी गळती थांबवण्याची आवश्यकता आहे. भर उन्हाळ्यात असे पाणी वाया जात आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT