सांगली

सांगली: विटा येथे विजेच्या खांबावर धक्का लागून खाली पडलेल्या तरुणाचा मृत्यू

अविनाश सुतार

विटा : पुढारी वृत्तसेवा : येथील नेवरी रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढलेला तरुण विजेचा धक्का लागून खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ विजय खटावकर (वय ३०, रा. शिवाजीनगर, विटा) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज (दि.९) सकाळी घडली. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी विटा आणि परिसरात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा पडल्या, खांब पडले, झाडे, झाडांच्या फांद्या जमिनीवर पडल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.

आज रविवारी सकाळी खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सोमनाथ खटावकर हा तरुण येथील नेवरी रस्त्यालगतच्या खांबावर चढला होता. तेथे कामावर असताना विजेचा झटका लागून तो खाली पडला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्याला कराड येथे पाठवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT