सांगली

चांदोली परिसर भूकंपाने हादरला; नागरिक भयभीत

मोहन कारंडे

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली परिसर आज बुधवार (दि.१६) सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने हादरला. वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून पश्चिमेला १५.२ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंपमापन केंद्रातून सांगण्यात आले.

चांदोली परिसराला भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील भांडी, कॉट, पंखे काही सेकंद हालत होत्या. काही नागरिक धक्क्यामुळे घराबाहेर पडले. मात्र क्षणातच हा धक्का थांबला. दरवर्षी धरण ८० ते १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असताना परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचा इतिहास आहे. सध्या धरण ८० टक्के भरले आहे. पावसाळ्यात बसलेला हा पहिलाच धक्का आहे. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या घटनेमुळे कोठेही जीवित व वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT