Morba Branch Canal Burst Pudhari
रायगड

Morba Branch Canal Burst: पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस; कालवा फुटून कडधान्य पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस; कालवा फुटून कडधान्य पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर : विनोद सापळे

रोहा तालुक्यातील कशेणे हद्दीत मोर्बा शाखेअंतर्गत असलेला सिंचन कालवा अखेर फुटलाच आणि पाटबंधारे विभाग प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना बसला. वाल,मुग, मटकी, यांसारखी कडधान्ये अक्षरशः पाण्याखाली जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

विशेष म्हणजे, 12 जानेवारी रोजी ‌‘कालवा धोक्यात‌’ असल्याची बातमी दै. पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊनही पाटबंधारे विभागाने गांभीर्याने याची दखल घेतली नाही. गाळ काढण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार वारंवार करण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कागदी अहवालांपुरतीच जबाबदारी उरकली आणि प्रत्यक्ष कामाकडे दुर्लक्ष केले. परिणामी, कालव्याचा वाढलेला पाणीदाब सहन न झाल्याने तो फुटला आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा महापूर घुसला. कशेणे गावातील दामाजी शिंदे, तुकाराम काशीराम येलकर, नथुराम शिंदे, सुरेश येटू शिंदे, सुरेश तुकाराम मुंडे, शांताराम राऊत, अनुसया राऊत यांसह सुमारे 27 शेतकऱ्यांच्या शेतातील कडधान्याचे पिके बाधित झाली आहेत.

मोर्बा शाखेअंतर्गत कालव्याचे गाळ काढण्याचे काम दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाटबंधारे विभागाकडून मशिनरीच्या साह्याने करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गाळ कालव्याच्या कडेला टाकून तो पुन्हा पाण्यात जाण्याची सोय करून दिली गेली. कालव्यातील झाडे, पारंराष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा परिणाम ?

इंदापूर ते कशेणे दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे काम सुरू असून, त्यामुळे कालव्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. योग्य समन्वयाअभावी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बिघडल्याचे स्थानिकांचे मत आहे. याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच दीपक जाधव, माजी संदेश मालोरे, उदय अधिकारी, महेश महाजन, नामदेव राव यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.

महामार्गाच्या हायवेच्या माती भरवाचे काम चालू असून संबंधित ठेकेदाराकडून हा कालवा वळविला असल्याने तो फुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित हायवे ठेकेदार व त्यांचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली असून ते किती जमिनीत पाणी जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वे करून त्याचा सर्वे ते करणार असुन ते संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहेत .आमच्याकडून नुकसान झालेली नाही. अशी माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता श्वेता चीचुरकर यांनी दिली.

हाय व्होल्टेज केबलचा गंभीर धोका

इंदापूर-तळारोड मोरी जवळ कालव्यात हाय व्होल्टेज केबल पाण्याच्या प्रवाहात लोंबकळत असल्याचेही समोर आले आहे. या धोकादायक परिस्थितीकडे महावितरण आणि कालवा अभियंत्यांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केबल लिक झाल्यास गाई-गुरे, माणसे यांना प्राणघातक धोका संभवतो. तरीही कोणतीही प्रतिबंधक कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

दोषींवर कठोर कारवाई करून तातडीने पंचनामा, नुकसानभरपाई आणि कालव्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल
दीपक जाधव राष्ट्रवादी युवक सचिव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT