

पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील महाडसह पोलादपूर तालुक्यातील मंदिरातील घंटा चोरणारा त्याच प्रमाणे खेडमध्ये मंदिरातील घंटा चोरी करणारा इसमास खेड पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील 16 चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे कौतुक होत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे व पोलादपूर पोलीस ठाणेमधील महाड एमआयडीसी पोलीस ठाणे, पोलादपूर पोलीस ठाणे येथील गुन्हा समावेश आहे
रत्नागिरी जिल्ह्याील खेडमधील शिरगाव खुर्द शिवाजीनगर येथील काळकाई देवीच्या मंदीरात दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वा. चे दरम्याने ते 4 ऑक्टोबर 2025 रोजी अज्ञात इसमाने मंदीरामधील पितळी घंटा, सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआर अश्या वस्तु चोरून नेल्या म्हणून खेड पोलीस ठाणे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय माहीतीच्या आधारे एक इसम हा वांरवार रत्नागिरी व रायगड परीसरात संशयास्पदरित्या वावरत असल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे तपास पथकामार्फत माहीती प्राप्त करून घेवून सदर इसम हा लोणावळा व खोपोली परीसरात असल्याचे समजले. खेड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने तात्काळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय माहीतीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेऊन आरोपी राकेश तुळशीराम पडवकर (वय 37 वर्षे, रा. कुसगाव लोणावळा, ता. मावळ, जि.पुणे), जगलाल रामनरेश केवट (वय-50 वर्षे रा. शांतीनगर वसाहत खोपोली ता. खालापूर जि. रायगड) यांना अटक केली आहे.
तर खेड पोलीस ठाणे, दाभोळ, दापोली, मंडणगड, बाणकोट, महाड, पोलादपूर असे असे 16 गुन्हे उघड झाले आहेत. खेडचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक अहीरे, पोलीस उपनिरीक्षक, रोहीदास केंद्रे, पोकॉ कृष्णा दराडे, पोकॉ विजेंद्र सातार्डेकर, पोकॉ वैभव ओहोळ, पोकॉ अजय कडू, पोकॉ शिरीष साळुंके यांनी ही धाडसी कामगिरी पार पाडल्याने पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यन पेण तालुक्यात काही महिन्यांपूर्वी मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस आता केलेल्या कारवाईत चोरट्यांना जेरबंद केल्याने मंदिरांमधील चोरीच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने मंदिर व्यवस्थापनांना मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे. यामुळे मंदिरांसारख्या धार्मिक स्थळांवरील गैरप्रकार समोर येऊन त्यावर निर्बंध बसेल. मात्र काही मंदिरांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली दिसून येत नाही.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमालामध्ये डिव्हीआर, हार्डडिस्क, सीसीटीव्ही कॅमेरा, हातोडा, लोखंडी छन्त्री, पितळी धातूची घंटा, घंटेचा लोलक, लोखंडी साखळी, समई, इलेक्ट्रीकल वजनकाटा, मंदिरांमधील इतर साहित्य, चारचाकी गाडी आदी असा एकूण 6 लाख 55 हजार 600 रुपये जप्त करण्यात आला आहे.