

रायगड : राज्यातील जिल्हा परिषद निवडणूकांनंतर आता सत्तास्थापने बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेट होवून सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
उभय नेत्यांमधील या चर्चेला मोठे महत्व असून, रायगड जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेससत्ता स्थापन करणार हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी या पूर्वीच घोषीत केले आहे. त्यास मोठे पाठबळ मिळाले आहे. परिणामी रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवले जाणार हे अधोरेखीत होताना दिसून येत आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार तटकरे पुढे म्हणाले, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आला होते. तेथेच आमची चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणूकींचे निकाल आले आहेत. राज्यात जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या निमीत्ताने राष्ट्रवादी काँग्रेस,
अजितदादांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी दरम्यान आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, मी, प्रफूल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अजितदादांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्याकडे या बाबत सरकार म्हणून पत्रव्यवहार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतल्याचे खा.तटकरे यांनी सांगीतले.