Murud Tokekhar Turumbadi Bridge Pudhari
रायगड

Murud Tokekhar Turumbadi Bridge: मुरुड–टोकेखार–तुरुंबाडी पूल दृष्टिक्षेपात; रायगडच्या विकासाला नवे पंख

८०९ कोटींच्या अगरदांडा खाडी पुलामुळे पर्यटन, रोजगार आणि सागरी महामार्गाला गती

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : मुरुड - टोकेखार तुरुंबाडी पूल दृष्टिक्षेपात येत असून मुरुडसह रायगडच्या विकासासाठी हा पूल अतिमहत्त्वाचा ठरणार आहे.विकासाचे चक्र आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे. 809 कोटी खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 4.3 किमी लांबीच्या अगरदांडा खाडी पुलासाठीच्या निविदा काढल्या आहेत ज्यात टोकेखार तुरुंबाडी गावांदरम्यानच्या नागरी बांधकामासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका देण्यात आला .रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग एसएच-4 (रेवस रेड्डी किनारी महामार्ग) वरील या दोन पदरी पुलाच्या बांधकामाला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जानेवारी 2024 च्या मध्यात मंजुरी दिली होती. हा पूल अदानी पोर्ट्स अँड एसईझेडच्या दिघी बंदर प्रकल्पाच्या पूर्वेला बांधला जातोय या पूल;यामुळे श्रीवर्धन व मुरुड तालुका जोडला जाणार असून दोन्ही तालुक्यात पर्यटन मोट्या प्रमाणात वाढणार आहे.

ज्याचा अंदाजित खर्च 809.89 कोटी रुपये आणि बांधकामाची मुदत 30 महिने होती, तसेच अतिरिक्त 10 वर्षांच्या देखभालीचा कालावधी होता. ह्यापूलसाठी अंदाजे 2000 कामगार लागणार आहे सद्य 1000 कामगार काम करत आहेत .पुढील काळात कामगाराची गरज असणार आहे .त्यासाठी मुरुड परिसरातील युवांना प्रशक्षित करून काम देण्याबाबदात खासदार सुनिलजी तटकरे यांनी मागणी केली आहे .त्यांनी प्रकल्प पाहणीच्या वेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या .अजूनही मुरुड तालुकयातील तरुणांना काम मिळत नाही याकडे लोकप्रतिनिधींनी पाहण्याची गरज आहे

सागरी महामार्गातील महत्वाचे दोन टप्पे कारंजा ते रेवस व दूसरा टप्पा टोकेखार ते तुरुंवाडी पुलामुळे मुंबईहून श्रीवर्धनल 2 तासात पर्यटक सामुद्राचा आनंद घेत प्रवास करू शकतो . पर्यटनाच्या विकासात सागरी महामार्ग महत्वाची भूमिका साकारणार आहे . प्रांतप्रधान नरेंद्र मोदींची कोकणातील सागरी महामार्ग व पर्यटन विकासाबाबत विशेष नियिजन असल्येने या महामार्गाला जोडणारे सर्व पूल तातडीने करण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले टोकेखार ते तुरुंवाडी पुलाच्या कामाची पाहणी केल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या शेती पुलासाठी जाणार आहे अशा शेतकर्यांनी व परिसरातील तरुण बेरोजगारांना काम मिळण्याबाबत आग्रही आहेत

कोकणासाठी सागरी महामार्ग

मुरूडहून श्रीवधन व दिवेआगर, रत्नागिरी कडे जाण्यासाठी रेवस रेड्डी किनारी महामार्ग तयार होणार आहे त्यासाठी या पुलाचे काम सुरु आहे .सद्य श्रीवर्धनला जाण्यासाठी रोरो बोटीतून जावे लागते ,वेळी जास्त लागतो पैसे ह्या या पुलामुळे श्रीवर्धन फक्त 40 किमी अंतर होणार आहे .त्यामुळे श्रीवर्धनच्या मुंबईला जाणाऱ्या गाड्या मुरूडहून जाणार असल्याने मुरुड बाजारात आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT