Raigad ZP Election 2026 Pudhari
रायगड

Raigad ZP Election 2026: रायगड जि.प. व पंचायत समिती निवडणूक : तिसऱ्या दिवशी 23 उमेदवारी अर्ज दाखल, शेवटच्या टप्प्यात ‘झुंबड’ अपेक्षित

अलिबाग, खालापूर, रोहा व माणगाव तालुक्यांतूनच अर्ज; 15 तालुक्यांत अद्याप शांतता

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 118 पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला. सोमवारी तिसऱ्या दिवशी अलिबाग, खालापूर, रोहा, माणगाव या चार तालुक्यांतून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर उर्वरित अकरा तालुक्यांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही. आतापर्यंत एकूण 23 अर्ज दाखल झाल आहेत. मात्र जिल्हयातील सर्वच तालुक्यांतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 816 व्यक्तींनी 1516 कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे.

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, मंगळवारी (19 जानेवारी) म्हणजेच तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अलिबाग, खालापूर आणि माणगाव तालुक्यांतून 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले. प्रशासनाच्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद मधून 6 व पंचायत समितीच्या दोन मतदारसंघांसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचे चित्र आहे. खालापूर तालुक्यांत पंचायत समिती गणांसाठी दोन तर माणगाव तालुक्यात जिल्हा परिषदसाठी पाच तर पंचायत समिती सहा असे एकूण 11 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

अलिबाग तालुक्यात जि.प.साठी पाच अर्ज

जिल्हा परिषदेच्या आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर यांनी उमेदवरी अर्ज दाखल केला. सोमवारी ( 19 जानेवारी) जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या चित्रा पाटील यांनी आंबेपूर मतदारसंघातून उमदेवार अर्ज दाखल केला. चेंढरे मतदरासंघातून आदिती नाईक, थळ मतदारसंघात मानसी महेंद्र दळवी, काविरमधून शिवसेनेचे अनंत गोंधळी यांनी अर्ज भरले. काविर गणातून शिवसेनेचे संतोष निगड यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी 12 अर्ज

जिल्हात 16 जानेवारीपासून आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, कावीर या मतदारसंघांतून सहा, रोहा तालुक्यातील घोसाळे, माणगाव तालुक्यातून पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. 15 तालुक्यातील 59 जिल्हा परिषद गटांसाठी 345 व्यक्तींनी 636 कोरे उमेदवारी अर्ज घेतलेले आहे. उरण तालुक्यातून सर्वाधिक कोरे अर्ज घेण्यात आलेले आहेत.

पंचायत समितीसाठी 11 अर्ज

जिल्हयात पंचायत समितीसाठी खालापूर तालुक्यातून दोन, अलिबागमधून दोन, माणगावमधून सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर पंचायत समितीच्या 118 गणांसाठी 471 व्यक्तींनी 880 कोरे उमेदवारी अर्ज घेतले आहे. पनवेल, पेण, रोहा, माणगाव येथून सर्वाधिक अर्ज घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे पंचायत समितीसाठी मंगळवारपासून उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT