

महाड : श्रीकृष्ण बाळ
ऐतिहासिक किल्ले रायगड व औद्योगिक विभागाचा परिसर समाविष्ट असताना देखील तालुक्यातील53 बिरवाडी जिल्हा परिषद गट व त्या मध्ये येणाऱ्या धामणे व बिरवाडी या दोन पंचायत समिती गणामध्ये रोजगार व शैक्षणिक व आरोग्याच्या नावाने नागरिकांची नाराजी असल्याचे चित्र मागील पंधरा वर्षापासून कायम असल्याचे पाहण्यास मिळत असून ते बदलण्याची गरज असल्याची भावना या जिल्हा परिषद गटामधील व पंचायत समिती गणामधील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यातील53. बिरवाडी जिल्हा परिषद गटात सवाने ,वाळण बुद्रुक ,रायगडवाडी ,वाकी बुद्रुक , वाळण खुर्द, पाचाड ,आमशेत, मांघरून, पंदेरी, रानवडी खुर्द ,सांदोशी ,सावरट, दहिवड , पाने ,वाघोली, वारंगी , दापोली ,बावले, धामणे ,बिरवाडी आसनपोई ,ुसगाव , शेल ,साकडी ,इत्यादी 26 ग्रामपंचायती समाविष्ट आहेत
बिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये धामणे , बिरवाडी हे दोन पंचायत समितीचे गण येतात यामध्ये राजकीय दृष्ट्या पंचायत समिती गणामध्ये 20 ग्रामपंचायती. तर बिरवाडी पंचायत समिती गणामध्ये 6 ग्रामपंचायती समाविष्ट असून एकूण बूथ 39 आहेत यामध्ये . धामणे पंचायत समिती गणामध्ये . भारतीय जनता पक्षाकडे 1 ग्रामपंचायत तर शिवसेना शिंदे गटाकडे 17 ग्रामपंचायती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 2 ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे
तर बिरवाडी पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट असणाऱ्या 6 ग्रामपंचायती. या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत महाड तालुक्यातील 53 बिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये धामणे व बिरवाडी हे दोन पंचायत समिती गण असून यामध्ये औद्योगिक वसाहतीचा परिसर ते वाळन कोंडी व सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामध्ये वसलेला ऐतिहासिक रायगड किल्ला या परिसरात असणारी गावे ही ग्रामीण भागातील व दर्या खोऱ्यात वसलेली असून या ठिकाणी ऐतिहासिक रायगड किल्ला व वाळन कोंडी असा ऐतिहासिक परिसर असून या ठिकाणी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर वावर दररोज असतो मात्र पाणीटंचाई रोजगार आरोग्यवस्था व दळणवळणाच्या व शिक्षण व्यवस्थेचा मात्र या मतदारसंघात अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शहरापासून जवळ गावे असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना नसल्याने आजही रोजगारासाठी येथील तरुण मुंबई ,ठाणे ,पुणे यासारख्या शहरात जात आहे शहरापासून या जिल्हा परिषद मतदार संघातील गावे दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली असल्याने प्रामुख्याने बिरवाडी व . पाचाड ही दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र असून वैद्यकीय उपचारासाठी व शैक्षणिक सुविधांसाठी येथील नागरिकांना व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाड व बिरवाडी परिसरातीलच असणाऱ्या शाळा व महाविद्यालयातील संस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे वीस ते पंचवीस किलोमीटरचे अंतर कापून दररोज तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठे सहित शैक्षणिक सुविधा व आरोग्य सुविधांसाठी येथील जनतेला यावे लागते एसटी व 6 आसनी मिनीडोर यामधूनच उभ्याने व गर्दीतूनच प्रवास करावा लागतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र सक्षम करण्यात पंधरा वर्षात अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
जलजीवन योजनेच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जलजीवन योजनेचा विलंबाने होणाऱ्या पूर्ततेमुळे पुन्हा या ग्रामीण भागातील व सह्याद्रीच्या पर्वतरांगात राहणाऱ्या महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा, ऐन उन्हाळ्यात टँकर व पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ मात्र न चुकता चालू वर्षी देखील पाहण्यास मिळणार आहे.
शिक्षण आरोग्य याचप्रमाणे दूरध्वनी व्यवस्था देखील या ग्रामीण भागात पूर्णपणे कोलमडलेली आहे केंद्र सरकारची बीएसएनएल ही दूरध्वनी सेवा तर ग्रामीण भागात आता बंदच पडल्यात जमा आहे यामुळे महागड्या असणाऱ्या खाजगी कंपन्यांवर व त्यांच्या नेटवर्क वरच ग्रामीण भागातील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी पर्जन्यवृष्टी मात्र जानेवारी महिना संपताच पाण्यासाठी दाही दिशा अशी वेळ या मतदारसंघातील जनतेवर येते.