Raigad Police Bharti 2026 Pudhari
रायगड

Raigad Police Bharti 2026: रायगड पोलीस भरतीला सुरुवात; 97 जागांसाठी 5,373 अर्ज, अलिबाग मैदानात कडेकोट बंदोबस्त

बायोमेट्रिक पडताळणी, चिप तंत्रज्ञान व सीसीटीव्ही निगराणीखाली प्रक्रिया; दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड पोलीस विभाग पोलीस भरती प्रक्रिया बुधवारपासून (11 फेब्रवारी) सुरू झाली आहे. एकूण 97 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी एकूण 5 हजार 373 अर्ज आले आहेत. अलिबागमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही पोलीस भरती सुरु झाली आहे.

रायगड जिल्हा पोलीस भरती सन 2024-25 साठी 11 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पोलीस मुख्यालय, रायगड-अलिबाग येथे पार पडणार आहे. ही पोलीस भरती पोलीस शिपाई 94 पदे व चालक पोलीस शिपाई 3 पदे यांचेकरीता राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 2915 व महिला उमेदवारांचे 648 असे एकूण 3563 अर्ज आले आहेत तर चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पुरूष उमेदवारांचे 1643 व महिला उमेदवारांचे 167 असे एकूण 1810 अर्ज आले आहेत.

या पोलीस भरती बंदोबस्ताकरीता 42 पोलीस अधिकारी, 329 पोलीस अंमलदार व 36 मंत्रालयीन कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी 10 फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालय, रायगड अलिबाग येथे पोलीस भरती बंदोबस्ताची रंगीत तालीम पार पडली. या पोलीस भरतीमध्ये उमेदवारांची बायोमॅट्रिक, प्रत्यक्ष फोटो पडताळणी, चिप रेजिस्ट्रेशन, संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली, प्रत्येक इव्हेंटवर व्हिडीओ रेकोर्डिंग, 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर इव्हेंटसाठी चिप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक इव्हेंटसाठी अधिकारी इन्चार्ज नेमण्यात येणार आहेत.

सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडणार असून कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा असणार नाही. कोणत्याही उमेदवाराकडून उत्तेजक द्रव्यांचे सेवन होवू नये याकरिता उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक पथक नेमण्यात आलेले आहे. पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, पोलीस भरतीत निवड करून देण्याचे आमिष दाखवणा-या दलालांपासून सावध रहावे. भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पार पडणार आहे. कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असल्यास किवां आर्थिक गैरव्यवहार संशय आल्यास तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधण्यात यावा. तसेच उमेदवारांची राहण्याची व्यवस्था अल्पदरात करावी यासाठी रायगड पोलीस दलाकडून सर्व हॉटेल, लॉजेस, निवास्थान व्यवस्था पुरविणारे, मंगल कार्यालय यांना आवाहन करण्यात आले आहे.

ही पोलीस भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडणार असून कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा असणार नाही. कोणत्याही उमेदवाराकडून उत्तेजक द्रव्यांचे सेवन होवू नये याकरिता उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक पथक नेमण्यात आलेले आहे. पोलीस भरतीत निवड करून देण्याचे आमिष दाखवणा-या दलालांपासून सावध रहावे. भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पार पडणार आहे. कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहार संशय आल्यास तत्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा.
आँचल दलाल, अधीक्षक, रायगड पोलीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT