Poladpur Panchayat Samiti election: पोलादपूर पंचायत; अनिल दळवी की अविनाश शिंदे - सभापतीपदासाठी जोरदार चुरस

चारही जागांवर शिवसेना-शेकाप युतीचे वर्चस्व; सर्वसाधारण आरक्षणामुळे सत्तेचे गणित रंगात
Poladpur Panchayat Samiti election
Poladpur Panchayat Samiti electionPudhari
Published on
Updated on

पोलादपूर : पंचायत समिती पोलादपूरच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाचे असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहिर झालेल्या पोलादपूर पंचायत समितीच्या कोतवाल बुद्रुक आणि कापडे बुद्रुक गणांमध्ये मुख्य चुरस वाढली आहे. पंचायत चार ही जागांवर शिवसेना व शेकाप युती ची निर्वादीत सत्ता आली असून शिवसेनेचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अनिल दळवी व अविनाश शिंदे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

Poladpur Panchayat Samiti election
Chandrakant Patil | पिल्लई विद्यापीठामुळे राज्यात ज्ञानयुगाची नवी सुरुवात : चंद्रकांत पाटील

पोलादपूर तालुक्यात लोकसंख्येच्या निकषानुसार कोंढवी पंचायत समिती गणाचे नामांतर 118 कोतवाल बुद्रुक असे झाले या ठिकाणी राष्ट्रवादी भाजपचे कमल चिन्हा वर सुरेंद्र चव्हाण तर त्याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे अविनाश कृष्णा शिंदे यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये अविनाश कृष्णा शिंदे यांना 4 हजार 29 मते तर सुरेंद्र चव्हाण यांना 2808 मते मिळाली अविनाश शिंदे हे 1 हजार 221 मतांनी विजयी झाले. तर देवळे पं.स.गणाचे नामांतर 116कापडे बुद्रुक असे झाले असून दोन्ही गणांमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाले आहे.

पंचायत समिती पोलादपूरच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाचे आहे. त्यामुळे या गणांमध्ये शिवसेनांतर्गत प्रभावी व्यक्तींची चुरस सभापती होण्यासाठी वाढली होती या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप तर्फे अनिल मालुसरे च्या विरोधात गतवेळेचे शिवसेना उमेदवार अनिल दळवी नव्याने नशीब आजमावत होते या वेळी अनिल दळवी यांनी 2017 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवा चा वचपा काढत 2026 च्या निवडणुकीचे 2 हजार 421 मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यांना 4 हजार 425 तर विरोधातील उमेदवार अनिल मालुसरे यांना 2004 मत प्राप्त झाली होती.

Poladpur Panchayat Samiti election
Shrivardhan Zilla Parishad: श्रीवर्धन पं.स.मध्ये सत्तास्थापनेचा ताळेबंद बदलला

मागील निवडणुकीत पोलादपूर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी गोवेले 115 पं.स.गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेकापक्षाच्या नंदा दिनकर चांदे, देवळे 116 पं.स.गणातून सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसचे शैलेश सलागरे, लोहारे 117 पं.स.गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून शिवसेनेचे यशवंत कासार तर कोंढवी 118 पं.स.गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून काँग्रेसच्या दिपिका दरेकर या निवडून आल्या होत्या.

कापडे बुद्रुक पं.स.गणामध्ये देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-1, वाकण-2, नाणेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक-1, कापडे बुद्रुक-2, कापडे बुद्रुक-3, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर आणि साखर या मतदान केंद्रांचा समावेश आहे. 116 कापडे बुद्रुक गणामध्ये 18 मतदान केंद्र असून 5 हजार 316 पुरुष आणि 5 हजार 174 महिला अशी एकूण 10 हजार 490 मतदार संख्या पैकी 6 हजार 535 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Poladpur Panchayat Samiti election
Mangaon ZP Election: माणगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व; पंचायत समितीवर भगवा, जिल्हा परिषदेत 2-2 चे समीकरण कायम

118 कोतवाल बुद्रुक पं.स. गणामध्येदेखील सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाले असल्याने या गणात काटेतळी, सडवली, चोळई, कोंढवी, महालगूर, ओंबळी, कोतवाल खुर्द, परसुले, कोतवाल बुद्रुक, कुडपण बुद्रुक, पैठण, भोगाव खुर्द, महाळुंगे, मोरगिरी, फौजदारवाडी, धामणदिवी, देवपूर, पळचिल, गोळेगणी या एकूण 19 मतदान केंद्रांत 5 हजार 64 पुरुष आणि 5 हजार 405 महिला अशी एकूण 10 हजार 669 मतदारसंख्या पैकी 6 हजार 950 मतदारांनी आपले बहुमूल्य मत देत कर्तव्य बजावले होते.

117 लोहारे गणाचे सर्वसाधारण आरक्षण महिला राखीव झाले या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप तर्फे युगज्ञा उतेकर च्या विरोधात अनिता अनिल भिलारे शिवसेना तर्फे निवडणूक ला सामोरे गेले त्यात 5 हजार 779 मतदारांनी मतदान चे मूल्य अनिता भिलारे याच्या पारड्यात 3 हजार 231 मत देत त्यांना 792 च्या फरकाने विजयी केले त्याच्या विरोधात असणाऱ्या युगज्ञा उतेकर यांना 2 हजार 439 मतदान झाले होते.

Poladpur Panchayat Samiti election
Murud Janjira Panchayat Samiti Election: मुरुड पंचायत समितीवर भगवा; तालुक्यात शिंदे शिवसेनेचेच वर्चस्व !

117 लोहारे पंचायत समिती गणामध्ये सवाद-1, सवाद-2, कणगुले, पार्ले, लोहारे,-1, लोहारे-2, चरई, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, वझरवाडी, दिवील अशी एकूण 12 मतदान केंद्र असून 4 हजार 149 पुरुष आणि 4 हजार 177 महिला मतदार एकूण 8 हजार 326 मतदार संख्या होती

मागील निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापक्षाची निवडणुकपुर्व आघाडी होती. परिणामी, या आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ची भाजप सोबत युती झाली आहे त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळाले होते शरद पवार गटाला 1 पंचायत माटवन जागा सोडण्यात आली होती त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर हर्षदा वरवाटकर रिगणात होत्या तर त्या विरोधात शिवसेना शिंदे गट व शेकाप युतीच्या साक्षी काबलेकर खटारा चिन्हा वर निवडणुक लढवत शेकाप ची तालुक्यात शेकाप तटबंदी मजबूत असल्याचे दाखवून दिले त्यांना या पंचायत समिती गणात3 हजार 335 तर हर्षदा वरवाटकर यांना 2 हजार 124 मत मिळाली सदरच्या गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव झाला होता.

Poladpur Panchayat Samiti election
Panvel Panchayat Samiti Election: पनवेलमध्ये शेकापच्या गडावर भाजपाचा झेंडा

अडीच वर्षात सव्वा सव्वा वर्षेचा फॉर्म्यूला वापरला जाणार

पोलादपूर पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी असल्याने सभापती पदी अनिल भिलारे किंवा अनिवाश शिंदे यांच्या पैकी एकाला मिळणार आहे. पहिल्या अडीच वर्षात सव्वा सव्वा वर्षेचा फॉर्म्यूला वापरला जाणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news