उरण : शहरालगत असलेल्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर संरक्षण कठड्याच्या मोठमोठ्या दगडांचा खच पडल्याने पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यास अडचण होत आहे. तर बंधाऱ्याचे दगड कोसळत असल्याने तटबंदी ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे
उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. त्यातच उरण तालुक्याला लाभलेला पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एकमेव किनारा आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, उरणच्या या समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी नागाव ते दांडा समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 15 फूट उंचीचा दगडी बंधारा टाकण्यात आला.
उरण पासून 3 ते 4 अंतरावर हा समुद्र किनारा आहे. रेल्वेने गेल्यास बेलापूर रेल्वे स्थानकात उतरुन रिक्षाने या समुद्र किनाऱ्यावर जाता येते.निसर्गरम्य वातावरण, चौफेर अथांग पसरलेला समुद्र, नवी मुंबईतील या सिक्रेट समुद्र किनाऱ्यावर फिरताना मोहित होऊन जाते. बीच हा सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळेस सूर्यप्रकाशात समुद्र किनाऱ्यावरची वाळू आणि लाटा सोनेरी रंगात चमकू यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे.
कोट्यवधी रुपये खर्चुन लहान-मोठ्या आकाराचे दगड एकमेकांवर रचून हा बंधारा बांधण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बंधाऱ्यावरील दगड खाली वाळूमध्ये कोसळल्याने किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना अडचण निर्माण झाली आहे. तर किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला खडक असल्याने त्या ठिकाणी खाली उतरून फिरणे शक्य नसलयाचे पर्यटकांचे म्हणणे आहे