पनवेश शहर : पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडने च्या ट्रीटेड वॉटर टनेल प्रकल्प पॅकेज अंतर्गत साई गाव ते विंधाणे गाव जोडणाऱ्या 6.27 किमी लांबीच्या या ट्रीटेड वॉटर टनेल बोरिंग मशीन ब्रेकथ्रू यशस्वीरीत्या पूर्ण करत देशात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात तब्बल 812.466 मीटर टनेलिंग पूर्ण करत भारतातील सर्वाधिक मासिक प्रगतीची नोंद केली.
साई गाव, पनवेल येथे कटरहेड नियोजित स्थळी बाहेर पडताच टनेलिंग टप्प्याचा यशस्वी समारोप झाला. हा प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा चार महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आला असून, कामादरम्यान 10 लाखांहून अधिक सुरक्षित मनुष्य-तास शून्य अपघातांसह नोंदवण्यात आले.
3.2 मीटर व्यासाच्या “टिबोटी खांड्या” या द्वारे ही टनेलिंग मोहीम राबविण्यात आली. अत्याधुनिक यांत्रिक पद्धतीमुळे अचूक उत्खनन, अधिक सुरक्षितता आणि जमिनीवरील कमीतकमी व्यत्यय साध्य झाला.
पटेल इंजिनिअरिंगच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता शिरवईकर यांनी या यशाचे श्रेय प्रकल्पातील अभियंते, ऑपरेशन्स व सुरक्षा विभागातील समन्वय आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीला दिले. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ब्रेकथ्रूचे स्वागत करत नवी मुंबईच्या भविष्योन्मुख विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
टनेलिंग टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे पुढील काम च्या आराखड्यानुसार पुढे नेले जाणार असून, या यशामुळे पटेल इंजिनिअरिंगने यांत्रिक टनेलिंग क्षेत्रातील आपले नेतृत्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
साई गाव ते विंधाणे गाव जोडणाऱ्या 6.27 किमी लांबीच्या या ट्रीटेड वॉटर टनेलमुळे नवी मुंबईतील वाढत्या निवासी, व्यावसायिक व औद्योगिक गरजांसाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा अधिक सक्षम होणार आहे. च्या दीर्घकालीन जलसुरक्षा आराखड्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.