रायगड

Panvel Landslide : पनवेल -चिंचपाडा हद्दीत शिलात, ओवेळे पुनर्वसित गावाजवळ भूस्खलन

मोहन कारंडे

पनवेल; विक्रम बाबर : मुसळधार पाऊसामुळे वरचे ओवले गावात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. डोंगरावरील सर्व माती वसाहतीमध्ये घुसली आहे. त्यामुळे अनेक इमारतींमध्ये चिखल भरला आहे, तर गाड्या देखील चिखलात अडकल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील खालापूर मधील ईर्शाळवाडी येथील घटना ताजी असताना आता पनवेल तालुक्यातील भयान परस्थिती समोर आली आहे. नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने या ठिकाणच्या १० गावांचे विस्थापण केले होते. त्यापैकी 'वरचे ओवले' गावाचे डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी बुधवारी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भूस्खलन झाल्याची माहीती मिळत आहे. सिडकोने येथे भूस्खलन  होणार नाही, याची कुठलीही उपाययोजना केलेली नाही. दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुनर्वसित वरचे ओवले गाव r & r sector १ येथे चिखल रस्त्यावर आला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT