रायगड

आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांची घडविली रायगड सफर

अविनाश सुतार

रायगड: पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील सुमारे ४०० कार्यकर्त्यांना किल्ले रायगडची सफर घडविली. आज (दि.२८) सकाळी आमदार पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह रायगडवर दाखल झाले.

काही कार्यकर्त्यांनी पायरी मार्गाने तर आ. पवार यांच्यासह काही कार्यकत्यांनी रोप वे ने रायगड गाठला. गडावर राजसदर, होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर, शिवसमाधी या ठिकाणी कार्यकर्ते नतमस्तक झाले. गडावरील गाईडच्या मदतीने त्याचप्रमाणे स्वतः आमदार पवार यांनी गडाचा इतिहास आणि गडावरील वास्तुंची, ठिकाणांची माहिती या कार्यकर्त्यांना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशाने पावन झालेल्या किल्ले रायगडवर येवून आम्हाला नवी ऊर्जा प्राप्त झाल्याच्या भावना आ. पवार यांनी व्यक्त केल्या. गडावरील स्वच्छतेचे त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक, गाईड आणि रोप वे प्रशासनाकडून शिवभक्तांना करण्यात येणाऱ्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT