Matheran Tourism Decline Pudhari
रायगड

Matheran Tourism Decline: माथेरानमध्ये सुट्ट्यांच्या हंगामातही पर्यटकांची गळती; ई-रिक्षा वादाचा पर्यटनावर परिणाम

मिनिट्रेनमध्ये मोजके प्रवासी, बाजारपेठेत शुकशुकाट; हॉटेल व व्यावसायिकांना आर्थिक फटका

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

पर्यटन नगरी माथेरानमध्ये ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांची गळती दिसत असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. काही दिवसांपूर्वी ई रिक्षांचा बंद पुकारला होता. त्यामुळेच केवळ स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नाही. या अनुषंगाने पर्यटकांनी या स्थळाकडे पाठ फिरविल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

ई-रिक्षा असल्यामुळे याठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे परंतु काही दिवसांपूर्वी ई रिक्षाच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी या संघटनेने बेमुदत बंद पुकारला होता. हे सर्वदूर पसरल्याने याचा इथल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. धुलीवंदनाच्या सलग सुट्ट्या असताना देखील पर्यटकांअभावी बाजार पेठेत पूर्णपणे शुकशुकाट दिसत आहे.मिनिट्रेनच्या शटल सेवेत आणि नेरळहुन येणाऱ्या मिनिट्रेनमध्येही मोजकेच पर्यटक प्रवास करताना दिसत आहेत. सध्या याठिकाणी ई रिक्षेची सुविधा उत्तम प्रकारे सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांची संख्या तुरळक असल्याने लहानमोठ्या स्टोल्स धारकांसह व्यापारी वर्ग, दुकानदार, पॉईंट्स भागातील व्यावसायिकांना, लॉज धारक, हॉटेलधारकांना याची झळ पोहोचली आहे.

सलग सुट्ट्यांचा हंगाम असल्याने रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतुककोंडी होऊ नये म्हणून तयारी केली होती. काही प्रमुख मार्गावर जड-अवजड वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र गेली तीन दिवस पर्यटकांनी रायगडकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. माथेरानसह, जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी कमीच होती.

व्यावसायिकांना झळ

माथेरामधील मनिट्रेनच्या शटल सेवेत आणि नेरळहुन येणाऱ्या मिनिट्रेनमध्येही मोजकेच पर्यटक प्रवास करताना दिसत आहेत. सध्या याठिकाणी ई रिक्षेची सुविधा उत्तम प्रकारे सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांची संख्या तुरळक असल्याने लहानमोठ्या स्टोल्स धारकांसह व्यापारी वर्ग, दुकानदार, पॉईंट्स भागातील व्यावसायिकांना, लॉज धारक, हॉटेलधारकांना याची झळ पोहोचली आहे. आगामी तीन महिने हे पर्यटन हंगामाचे आहेत. या काळात पर्यटकांची संख्या वाढते.

ई-रिक्षाची सुविधा उपलब्ध असते त्यामुळे आम्ही याठिकाणी आलो आहोत. मध्यंतरी त्यांनी बंद पुकारला होता. ई-रिक्षांची संख्या वाढविली तर कुणालाही ताटकळत उभे राहावे लागणार नाही. आता इथे पर्यटक कमी प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणे गलबला दिसत नाही.
अंकुर मोकाशी, पर्यटक, मुंबई
माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायामध्ये मंदी पहावयास मिळत असून या काळात कामगारांचे पगार, विज बिल, पाणी बिल व इतर मेंटेनन्सची कामे करताना आर्थिक तोट्यास सामोरे जावे लागत आहे.
सचिन दाभेकर, व्यवस्थापक, हॉटेल हॉर्सलँड, माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT