Konkan Holi: महाडमधील होळी उत्सवात देव-दानव युद्धाची अनोखी परंपरा; निखाऱ्यांचा पाऊस आणि ग्रामस्थांचा जल्लोष

Mahad Holi Celebration Dev-Danav Yudh: महाड शहरातील गवळ आळी येथे दरवर्षी होळी उत्सव अनोख्या आणि थरारक परंपरेनुसार साजरा केला जातो.
Mahad Holi Celebration Dev-Danav Yudh
Mahad Holi Celebration Dev-Danav Yudhpudhari photo
Published on
Updated on

Konkan Holi Mahad Celebration Dev-Danav Yudh:

महाड: महाड शहरातील गवळ आळी येथे दरवर्षी होळी उत्सव अनोख्या आणि थरारक परंपरेनुसार साजरा केला जातो. मानाच्या होळीच्या निमित्ताने येथे ‘देव-दानव युद्ध’ ही आगळीवेगळी प्रथा पार पाडली. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा महाडच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.

गवळ आळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित केली जाते. होळी दहनानंतर ग्रामस्थांचे दोन गट तयार होतात आणि प्रतिकात्मक स्वरूपात देव-दानव युद्ध खेळले जाते. यावेळी होळीतील जळकी लाकडे आणि निखारे एकमेकांकडे फेकण्याची प्रथा पार पाडली जाते. रात्री उशिरा होणाऱ्या या होम आणि युद्ध सोहळ्याला पाहण्यासाठी महाड तालुक्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पारंपरिक श्रद्धा, उत्साह आणि थरार यांचा संगम असलेला हा अनोखा होळी उत्सव दरवर्षी प्रेक्षकांना आकर्षित करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news