नेरळ : आनंद सकपाळ
माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार पर्यावरण ई-रिक्षा सुरू झाली. त्यानुसार माथेरानमध्ये पर्यटन क्रांती घडत असली तरी मात्र या ई-रिक्षांची भासत असलेली कमी संख्या पाहाता स्थानिकांसह पर्यटकांना प्रवासाठी तासन्तास ई-रिक्षाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामध्येच या ई - रिक्षांचा सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयीन वापरासाठी होणारा उपयोग पाहता सध्यास्थितीत बंद असलेल्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या सात ई - रिक्षांचा वापर हा शासकीय बाबूंनी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
माथेरानमधील पर्यावरण ई - रिक्षा या शासकीय बाबूंना तत्काळ मिळत असल्याने, मात्र पर्यावरण ई- रिक्षांसाठी स्थानिकांनासह पर्यटकांना तब्बल दोन-दोन तास वाट पाहावी लागत असल्याने व शालेय विद्यार्थ्यांनादेखील याचा त्रास होत असल्याने, काही शालेय विद्यार्थ्यांनादेखील अनेकदा चालत येण्याची वेळ येत असल्याने, स्थानिकांमंधून नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याचा झालेला निर्णय हा नेमका कोणासाठी? असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.
दररोज या ई-रिक्षा सेवेचा लाभ हा पर्यटकांसह स्थानिक माथेरानकर घेत असतात. स्वस्त आणि कमी वेळात प्रवास करण्याची एक उत्तम सुविधा ई-रिक्षाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. परंतु केवळ 20 ई-रिक्षांपैकी 7 ते 8 रिक्षा सुरू असल्याने, या बाकीच्या विविध अडचणी उपलब्ध होत आहे.
माथेरानमध्ये सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट वेळी 7 ई-रिक्षा या माथेरान गिरीस्थान नगरपरिषदे मार्फत खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार संघटनेच्या एकूण 94 पैकी हाथरिक्षा चालक सदस्यैांकी 20 ई-रिक्षा या काही हाथरिक्षा चालकांना देण्यात आल्या. त्यातील 7 ते 8 ई - रिक्षाच उपलब्ध असतात. तर काही शालेय विद्यार्थी तर बाकीच्या ई - रिक्षा चार्जिंगसाठी तर काही तांत्रिक बिघाडामुळे बंद असतात. त्यातच या पर्यावरणपूरक ई- रिक्षांच्या दुरुस्तीची कोणतीही व्यवस्था ही माथेरानमध्ये उपलब्ध नसल्याने, या ई-रिक्षांच्या दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामध्येच शासकीय बाबू आल्यास उपलब्ध ई- रिक्षांपैकी काही ई - रिक्षा त्यांच्या दिमतीला सज्ज होत असल्याने, याचा त्रास हा माथेरानमधील येणाऱ्या पर्यटकांसह माथेरानमधील स्थानिक, विकलांग, वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ई-रिक्षाची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी होत आहे.
दररोज या ई-रिक्षा सेवेचा लाभ हा पर्यटकांसह स्थानिक माथेरानकर घेत असतात. स्वस्त आणि कमी वेळात प्रवास करण्याची एक उत्तम सुविधा ई-रिक्षाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. परंतु केवळ 20 ई-रिक्षांपैकी 7 ते 8 रिक्षा सुरू असल्याने, या बाकीच्या विविध अडचणी उपलब्ध होत आहे. सध्यास्थितीत बंद असलेल्या नगरपरिषदेच्या मालकीच्या सात ई - रिक्षांचा वापर हा शासकीय बाबूंनी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.