Konkan Mango Crop Loss Pudhari
रायगड

Konkan Mango Crop Loss: ढगाळ वातावरणाचा आंबा हंगामावर घाला; मोहर गळतीमुळे खाडीपट्ट्यात बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

अवकाळी पाऊस, धुके आणि तुडतुडे प्रादुर्भावामुळे फवारणी खर्च वाया; कृषी विभागाकडून पाहणी, शेतकरी आर्थिक संकटात

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

बदलत्या हवामानामुळे आणि विशेषतः ढगाळ वातावरणाने आंब्याचे अर्थकारण बदलले आहे. कोकणासह खाडीपट्टा भागात आंब्याला मोहोर येण्याचा काळ सुरू असताना झालेल्या ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

येथील आंबा बागायतदारांनी आंब्याच्या कलमांवर केलेला तीन ते चार वेळा फवारणीचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. आंबा बागातदारांनी मोठी मेहनत घेऊन या वर्षाच्या सुरुवातीला चांगल्या फुलून आलेल्या आंबा बागायती खाडीपट्टयात फेरफटका मारला असता सगळीकडे पाहायला मिळाले. मात्र झाडांवरआलेले मोहर अगदीच हातातोंडाशी आलेला घास जाताना पाहून आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

प्रति झाडाला फवारणी करण्यासाठी एकूण पाचशे ते सहाशे रुपये एकवेळचा खर्च येत असल्याचे येथील आंबा बागायतदार यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर सध्या वातावरणामध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे झाडांना चांगले मोहर आले होते मात्र ढगाल वातावरणाने मोहर काळा पडून गळू लागले आहे त्यामुळे येथील आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंबा बागायतदारांनी आत्तापर्यंत चार ते पाच वेळा किटकनाशकांची फवारणी केलेली असताना, मात्र वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे झाडांना आलेले मोहर काळे पडू लागले असून ते आता गळेल त्यामुळे आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.कोकणासह खाडीपट्टयामध्ये या ओढावलेल्या आंबा बागायतदारांवरील संकटामुळे कृषी खात्याचे अधिकारी तात्काळ पाहणी करण्यासाठी थेट आमराईमध्ये पोहोचलेले पाहायला मिळाले. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या आंबा बागायतदारांना धीर दिला आहे.

आंबा बागायतदार संकटात

गेल्या दहा-बारा वर्षापासून सातत्याने खाडीपट्टयातील आंबा पिकाला लहरी हवामानाचा फटका बसत आहे. यंदाही ऐन हंगामात मोहर चांगले आले असताना हातातोंडाशी येणाऱ्या घासापूर्वीच ढगाळ वातावरणाने आंबा बागायतदारांचा घास हिरावून घेतला आहे.

ढगात वातावरणाने आंबा वृक्षांवरील आलेले मोहर काळेकुट्ट पडले आहे. ते आता गळून आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
मारुती बरकडे, कृषी सहाय्यक, खाडीपट्टा
आंबा कलमांची जोपासना,कलमांचे इन्शुरन्स,मजूरदारांची मजुरी असे भरपूर खर्च येत आहे, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच वेळा फवारणी केली होती, मात्र वातावरणाचा फटका बसल्याने मोहर काळाकुट्ट पडला असून तो गळून पडेल, त्यामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
आरिफ उबारे, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त, चिंभावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT