Anganwadi workers protest : प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमक

मानधन वाढीसह प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न केंद्रस्थानी; 24 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाचे आयोजन
Anganwadi workers protest
प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमकpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून आझाद मैदान येथे भव्य मोर्चा आणि तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. राज्यभरातील सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कृति समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही समाधानकारक निर्णय झालेला नाही. त्यामुळे अखेर राज्यव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. मोर्चापूर्वी शासनाने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Anganwadi workers protest
Raigad Fort highway : किल्ले रायगड महामार्ग तर बनला; नेटकेपणा कधी येणार?

राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 पासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 3000 रुपये आणि मदतनिसांच्या मानधनात 2000 रुपयांची वाढ जाहीर केली होती. तसेच कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी हा भत्ता नियमित मिळत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात समाविष्ट करून सेविकांना दरमहा 15,000 रुपये आणि मदतनिसांना 8,500 रुपये मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क असल्याचा निर्णय दिला असतानाही राज्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ग्रॅच्युइटी आणि सेवासमाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावेत, अशी समितीची भूमिका आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वारंवार आंदोलने करूनही प्रश्न न सुटल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये शासन व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे कृति समितीने स्पष्ट केले आहे. मोर्चापूर्वी शासनाने चर्चेसाठी वेळ द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Anganwadi workers protest
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडीत सत्तापालट! भाजपचे बंडखोर नारायण चौधरी नवे महापौर; काँग्रेसने फिरवला गेम

दरम्यान, राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी मुंबई येथे येणार असल्याने आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कामाचा वाढता बोजा

अंगणवाडी केंद्रांना देण्यात आलेले मोबाईल फोन व ॲप्स योग्यरीत्या कार्यरत नसल्याने कामात अडथळे येत असल्याची तक्रार आहे. सुसंगत उपकरणे उपलब्ध करून देण्यासह डेटा रिचार्जसाठी दरमहा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विविध योजनांची अतिरिक्त पडताळणी व इतर खातेबाह्य कामे अंगणवाडी सेविकांकडून करून घेतली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

थकीत देयके आणि प्रोत्साहन निधी

टीए-डीए, इंधन बिल, सिम रिचार्ज तसेच केंद्र शासनाकडील पोषण ट्रॅकर व इतर योजनांशी संबंधित प्रोत्साहन निधीही अनेक ठिकाणी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. ही सर्व थकीत देयके तातडीने अदा करावीत, अशी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news