First woman officer Matheran : माथेरान पोलीस ठाण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे

सरिता मुसळे यांची नियुक्ती; इतिहासात प्रथमच महिला पोलीस निरीक्षक
First woman officer Matheran
माथेरान पोलीस ठाण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडेpudhari photo
Published on
Updated on

नेरळ : माथेरानच्या पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून कायदा सुव्यवस्था राखण्या प्रति इतिहास पहाता आतापर्यंत जबाबदारी ही पुरूष पोलीस अधिकारी यांनी संभाळल्याचा इतिहास हा मोडीत काढत, प्रथमच माथेरान पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी एका महिला पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांची झालेली नियुक्ती ही माथेरानमधील नागरिकांसाठी गौरवाची बाब ठरत आहे.

जागतिक स्तरावर थंड हवेचे व पर्यावरण पूरक अशा माथेरान प्रसिध्द अशा माथेरानच्या पोलीस ठाण्याचे स्थापनेपासून आतापर्यंत माथेरानमधील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पुरूष पोलीस अधिकारी यांनी संभाळली आहे. माथेरानचे सध्याचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनिल सोनोने यांचा पोलीस नियमानुसार माथेरान पोलीस ठाणे येथील कार्यकाळ संपला असल्याने, त्यांची बदली ही रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे येथे उपनिरिक्षक झाली असल्याने, त्यांचे जागी पोलीस सेवेत सन 2012 मध्ये रुजू झालेल्या माहिला उपनिरिक्षक सरिता मुसळे यांची नियुक्ती झाली आहे.

First woman officer Matheran
Anganwadi workers protest : प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडीसेविका आक्रमक

त्यांनी मुंबई येथे पहिला आपल्या पदाचा कार्यभार हाती घेत, नंतर नवी मुंबई, पालघर त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत, महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार गुन्हयावरती उत्तम कामगिरी बजावत प्रथमच माथेरान पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून 18 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यभार हाती घेतला आहे. यावेळी त्यांना माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अनिल सोनोने यांनी आपली सुत्रे ही नविन प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

त्यांनी सुत्र हाती घेतल्या नंतर माथेरान मधील ई -रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व ई -रिक्षा चालक यांनी त्यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सरिता मुसळे यांचा वकील अभ्यास देखील पूर्ण झाला आहे. त्या मुंबई सारख्या ठिकाणी पोलीस सेवेत रूजू असल्याने, त्यांचा पारशी मालमत्ते कायद्या विषयी उत्तम आभ्यास असल्याने, मात्र माथेरान मधील असलेले पारशी मालमत्ते कायद्या संदर्भातील पोलीस कामकाजातील तक्रारी सोडविण्यासाठी त्यांना योग्य अशी मदत देखील होणार आहे. मात्र माथेरानच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पदी प्रथमच एका महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती झाल्याने, मात्र माथेरान मधील नागरिकांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.

First woman officer Matheran
Raigad Fort highway : किल्ले रायगड महामार्ग तर बनला; नेटकेपणा कधी येणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news