Gold Price Surge Pudhari
रायगड

Gold Price Surge: लगीनसराईत सोन्याचा दर 1.57 लाखांवर; सराफा बाजारात खरेदी मंदावली

चांदीही 2.65 लाखांच्या घरात; दरकपातीच्या अफवांमुळे ग्राहक प्रतीक्षेत, पेढ्यांना मोठा फटका

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : ऐन लगीनसराईतच सोन्या,चांदीच्या दरात होतअसलेल्या दरवाढीचा मोठा फटका पेढ्यांना बसत असून,ग्राहकांकडूनही खरेदी मंदावली असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.ही दरवाढ अशीच होत राहिली तर त्याचा मोठा फटका सराफा बाजाराला बसण्याचीशक्यता वर्तविली जात आहे.

लग्न असो वा कुठलेही धार्मिक कार्यक्रम.या निमित्ताने सोन्या,चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा सर्वत्र आहे.गेल्या वर्षभरात सोन्या,चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेल्याने याचा मोठा फटका सोने व्यापाऱ्यांना बसला आहे.विशेष करुन मोठमोठ्या सुवर्णपेढ्यांमधील ग्राहकांची गर्दी मंदावली आहे.सध्यातर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1 लाख 57 हजार रुपये असा आहे.त्याचा मोठा फटका खरेदीवर बसला आहे.वधु,वरांचे दागिने घेताना दोन्ही बाजूकडून हात आखडता घेतला जात असल्याचे निदर्शनास येतआहे.

अशीच स्थिती चांदीबाबतही घडत आहे.सध्या चांदीचे दर 2 लाख 65 हजारअसेझालेले आहेत.हे दर पाहूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.लग्नात किमान मंगळसूत्रघ्यायचे म्हटले तरी किमान तीन तोळ्याचे अपेक्षितअसते.सध्याच्या दराप्रमाणे ते करुन घ्यायचे झाल्यास पाच लाखाच्या आसपास किंमत जाते.अर्धा तोळ्याची अंगठीच आता 80 हजारांच्या घरात पोहोचली आहे.यामुळे आता लग्न सोहळ्यातील सोने खरेदी काहीप्रमाणात मंदावत असल्याचे दिसतआहे. गरज असेल तरच सोने खरेदी होत आहे.

दर उतरण्याची अफवा

सध्या सोशल मीडियावर सोन्याचे दर कमी होणारअशी जोरदार चर्चा सुरू आहे.तशाप्रकारच्या रिळ्सही व्हायरल होताना दिसत आहेत.यामुळे ग्राहक ही दरवाढ कमी कधी होते याकडे लक्ष ठेऊन आहेत.त्याचाहीफटका खरेदी,विक्रीवर होत आहे.पण व्यापारी वर्गाच्या मतानुसार सध्या तरी सोन्याच्या दरात घसरण होणे अपेक्षित नाही.झाली तरी ती फार मोठी नसणार असल्याचे सुचित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT