Ajit Pawar Statement Pudhari
रायगड

Ajit Pawar Statement: "विकासासाठी सत्तेबरोबर जाण्यास गैर काय ?" उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

अजित पवारांचे सुचक प्रतिपादन ,ठाकरे शिवसेनेचे किशोर जैन समर्थकांसह राष्ट्रवादीत

पुढारी वृत्तसेवा

नागोठणे शहर : शामकांत नेरपगार

आता काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, देशाचे, महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. सत्ताधारी पक्षासोबत राहिलो तरच विकासाचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे आम्हीही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत आलो.विकासासाठी सत्तेबरोबर जाण्यात गैर काहीच नाही. आता त्याचभूमिकेला अनुसरुन ठाकरे शिवसेनेचे किशोर जैन यांनी राष्ट्रवादीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे सुचक प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागोठणे येथे मेळाव्यात केले.

सोमवारी राष्ट्रवादी मेळावा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, किशोर जैन, मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष कोकणे, राजीव साबळे, उमा मुंडे, स्नेहल जगताप, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, सुरेश मगर, भाईसाहेब टके, नरेंद्र जैन, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, संतोष कोळी, बाळासाहेब टके,प्रीतम पाटील, संजय भोसले, सरपंच सुप्रिया महाडिक, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आदींसह कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होता.

विकासाच्या दृष्टीने आम्ही दर्जेदार कामाला महत्व देतो. तरुण वर्गाच्या रोजगारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील असते. उद्योगधंदे आणताना पर्यवरणाला धोका पोहचता कामा नये तसेच प्रदूषणही होता कामा नये अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान वापरून उद्योगधंदे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे हेच आमचे काम आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत.

खा. सुनील तटकरे यांनी हा प्रवेश सोहळा रायगड जिल्ह्यातील राजकारणाला कालाटणी देणारा क्षण असून नागोठण्यातील राष्ट्रवादीची ताकद अधिक मजबूत झालेली आहे. एक एक बालेकिल्ला मजबूतीसाठी पाऊले चाललेले आहेत. किशोर जैन विरोधी पक्षात होते परंतु आमच्यात कधीही कटुता नव्हती. आता लवकरच नागोठण्यातील शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. रिलायन्स कंपनी कडून नागोठणे पंचक्रोशीचा विकास जामनगर धर्तीवर होण्यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही देऊन येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणूकीत आपल्या पक्षाला भरभरून यश येईल असा विश्वास व्यक्त केला.

रिलायन्सच्या माध्यमातून विकास

अंबानी कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत ते नागोठणे परिसराचा व्यवस्थित विकस रिलायन्स आयपीसीएलच्या माध्यमातून करतीलच परंतु मी देखील राज्य सरकार कडून विकासाची कमी पडू देणार नाही तसेच विकासकांमा बाबतीत कुठलीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागोठणेकरांना दिली.

विकासाची ग्वाही यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नागोठणे अंबा नदी खोलीकरण व नदीला सौरक्षण भिंत मिळायला पाहिजे. नागोठण्याचा शुद्ध पाणी योजनेचे लवकरच लोकार्पण. नागोठणे तालुका व्हावा तसेच रिलायन्स कंपनी कडून जामनगर धर्तीवर विकासाच्या दृष्टीने मास्टरप्लॅन झाला पाहिजे यासाठी अजित पवार ,खा.सुनील तटकर,मंत्रीआदिती तटकरे यांनी लक्ष द्यावे.
किशोर जैन,राष्ट्रवादी नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT