

कांदिवली : मुक्या प्राण्यांच्या छळ थांबवा, या मागणीसाठी रविवारी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलॅक्स येथे प्राणिमित्र एकवटले. प्युअर ऍनिमल लवर (पाल ) वेल्फेअर फाऊंडेशनच्या पुढाकाराने त्यांनी ‘करो या मरो’ आंदोलन करीत महापलिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
हातात फलक, मेणबत्ती घेऊन त्यांनी मुक्या प्राण्यांच्या न्याय हक्कासाठी जोरदार निदर्शने केली. आयोजित रॅलीत सेलिब्रिटी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर अनेक प्राणिप्रेमी सहभागी झाले होते. संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 किमी चालत ही रॅली काढण्यात आली.
शाळा आवारातील भटकी कुत्रे बाहेर काढण्याची जबाबबदारी नुकतीच शिक्षकांवर टाकली आहे. यावर प्राणिमित्रांनी संताप व्यक्त केला. अशा प्रकारचे कृत्य बेकायदेशीर आहे. अगोदर निवारा गृह तयार करा नंतरच ही कारवाई करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
मानव आणि प्राण्यांना जगण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. मुक्या प्राण्यांना वेदना होत आहेत आणि प्राणिप्रेमींना छळाचा सामना करावा लागत आहे. जर हे थांबले नाही तर आम्ही प्राणिप्रेमी आमचा स्वतःचा ‘प्राणी पक्ष’ काढू आणि आमचेच उमेदवारोंना मतदान करू असा इशाराही पाल फाउंडेशनचे प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक यांनी सांगितले.
कांदिवली : मुक्या प्राण्यांचा छळ होत असल्याचा आरोप करीत रविवारी अंधेतीरील लोखंडवाला कॉम्पलॅक्स येथे प्राणिमित्रांनी निषेध रॅली काढली होती.