

मुंबई : रिलायन्स फाउंडेशनच्या युनायटेड इन ट्रायम्फच्या दुसऱ्या आवृत्तीच्या कार्यक्रमात सोमवारी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते पुरुषांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक विजेत्या
भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा, महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दृष्टीहीनांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक विजेत्या महिला संघाची कर्णधार दीपिका टी.सी. यांना गौरविण्यात आले.