रायगड

Panvel Police : उत्तर प्रदेशाच्या जेलमधून फरार आरोपीला पनवेलमध्ये अटक 

अविनाश सुतार

पनवेल: पुढारी वृत्तसेवा:  हत्या करून उत्तर प्रदेशात शिक्षा भोगत असलेल्या तसेच जेलमधून फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहरात पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. पनवेल शहर पोलीस आणि एटीएस वाराणसीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. प्रवीण उर्फ प्रदीप पाल (वय २५  रा. अयोध्या,  उत्तरप्रदेश)  असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर  हत्या करणे, अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशातील रामकोला पोलीस ठाण्यात दाखल आहे. Panvel Police

उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता  न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तो जिल्हा कारागृह दवरिया, उत्तर प्रदेश येथे न्यायबंदी असताना एक नोव्हेंबररोजी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय देवरिया येथे नेला असता तो पळून गेला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेणाऱ्यास देवरिया पोलीस अधीक्षकांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. Panvel Police

27 फेब्रुवारीरोजी उत्तर प्रदेशमधील कोतवाली पोलीस ठाणे येथील आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप पाल हा पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती एटीएस वाराणसीचे अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांची त्यांनी मदत घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल अशोक राजपूत यांचे मार्गदर्शन व आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, अंजुमन बागवान, प्रवीण भगत, गुन्हे प्रगटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, अंमलदार यांना वाराणसी पथकाच्या मदतीसाठी रवाना केले. यावेळी आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप पाल हा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT