आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका आषाढी वारी निमित्ताने सोमवारी आजोळघरातून एस.टी.बसने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.  
पुणे

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

नंदू लटके

आळंदी : श्रीकांत बोरावके 

*जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥*

पंढरपूरच्या सावळ्या विठू रायच्या ओढीने परंपरेने पंढरपूरला जाण्याऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका यंदाही कोरोनामुळे पा मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवशाही एस.टी.बसने आळंदीतून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या.सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम हलवून सोमवारी (दि.१९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास चलपादुका मार्गस्थ झाल्या.

पहाटे पवमान अभिषेक,सकाळी आठ वाजता कीर्तन पार पडले त्यानंतर पादुका पूजन व आरती संपन्न झाली. माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला. कर्णा झाल्यानंतर माऊलींच्या पादुका हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी राजेंद्र आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या.

अधिक वाचा 

त्यांनी एस.टी.बस पर्यंत चालत जात पादुका मोजक्या चाळीस लोकांच्या समवेत हरिनाम, टाळ-मृदुंगाच्या गजरात एस.टी. महामंडळाच्या शिवशाही एस.टी.बसमध्ये विराजमान केल्या.

बस वर भाविकांनी पुष्पवृष्टी केली.बस पंढरीच्या दिशेने रवाना झाली यावेळी माऊली – माऊलींच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.

अधिक वाचा 

यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे-पाटील, विश्वस्त अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील,अशोकराव कांबळे, राहुल चिताळकर, अजित वडगावकर व मानकरी, वारकरी, भाविकउपस्थित होते.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT