हडपसर , पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर रोडवरील हडपसर उड्डाणपुलाच्या बीमला मोठी वाहने धडकून पुलाला धक्का बसू नये म्हणून प्रशासनाने सिमेंटचे डिव्हायडर लावलेले आहेत. या दुभाजकामुळे खालील रस्ता छोटा झाला असून, यामुळे वाहने धडकून अपघाताचे प्रमाण वाढू शकते.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ ते हडपसर गावापर्यंत जे डिव्हायडर बसविलेत, त्यामध्ये कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना ते दुभाजक नीट दिसत नसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत, तरी प्रशासनाने वाहनचालकांच्या लक्षात येईल यासाठी डिव्हायडरला विशिष्ट रंग देऊन किंवा रिफ्लेक्टर लावावे;
जेणेकरून वाहनचालकांना ते दुभाजक दिसतील आणि अपघात होणार नाही. तरी प्रशासनाने लवकरात लवकर दुभाजकाला रिफ्लेक्टर बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांना प्रत्यक्ष पत्र देऊन नागरिकांनी केली आहे
हेही वाचा