पुणे

ससाणेनगर परिसरात राज्यसभा निवडणुक विजयाचा आनंदोत्सव

अमृता चौगुले

कोंढवा, पुढारी वृत्तसेवा: ससाणेनगर-काळे बोराटेनगर परिसरात राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा आनंदोत्सव मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले यशस्वी नियोजन व राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे धनंजय महाडिक, पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे हे खासदारपदी विजयी झाले.

त्यामुळे प्रभाग क्र. 44 मध्ये साजरा करण्यात आलेल्या आनंदोत्सवाप्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 44 मधून भाजपचे तिन्ही नगरसेवक माजी अ टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील,

असा विश्वास माजी नगरसेविका विजया वाडकर व उज्ज्वला जंगले यांनी व्यक्त केला. या वेळी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रमोद सातव, हडपसर विधानसभा भाजप उपाध्यक्ष विकास भुजबळ, अश्विनी सूर्यवंशी, शोभाताई लगड, कार्तिकी घुले, ज्योती झुरुंगे, सुनील सातव आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT