पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्याविषयी विलास जोशी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर अपशब्द वापरून त्यांचा अनादर केला होता.
या प्रकाराच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी केलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिस ठाण्यात मंगळवार (दि. 7) रोजी रा. 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच बुधवार दुपारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर ब्रिगेडच्या वतीने होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती काळे यांनी दिली.
मात्र, आरोपीस तत्काळ अटक करावी, अशी मागणी देखील केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी दिला आहे.
हेही वाचा