पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 2026-27 पर्यंत टप्प्याटप्प्याने एकात्मिक आणि द्विभाषिक, सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. यंदा मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांतील दुसरीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात आली आहेत.
गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ विद्यार्थ्यांना इंग्रजीतून कळले आणि शिक्षकांनी अध्यापन करताना स्पष्टीकरण केल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे होईल, या विचारप्रवाहातून शालेय शिक्षण विभागाने पुस्तके द्विभाषिक करण्याचा निर्णय घेतला. आता टप्प्याटप्प्याने ही पुस्तके दिली जातील. विषयतज्ज्ञांशी सल्लामसलत करून अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी विद्या प्राधिकरण, पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारतीची असेल.
हेही वाचा