पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'प्रशासनातील अधिकार्यांच्या संवादामध्ये खंड पडू नये यासाठी यंदा वारीमध्ये वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे,' अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतून श्री संत तुकाराम महाराज यांची पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच वारकरी वारीमध्ये सहभागी होणार असल्याने त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. वारीमध्ये मोबाईल नेटवर्क जाम होतो, असा अनुभव असल्याने संवादामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. पालखी मार्गावर नियुक्त केलेल्या महसूल अधिकार्यांमध्ये संवाद होण्यासाठी दोन्ही पालखी मार्गांवर प्रत्येकी 25 वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे.
पालखी मार्गावर येणार्या अडचणी सोडविणे आणि आवश्यक सोयी-सुविधा वेळेत पोहोचविणे यासाठी वॉकीटॉकी उपयोगी पडेल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. पालखी मार्गावरील प्रांतअधिकारी यांच्याकडे वॉकीटॉकीचे नियत्रंण असणार आहे. त्यांनी नेमून दिलेले अधिकारी वॉकीटॉकीचा वापर करतील.
वारी सर्वांसाठी खुली असल्याने सहभागी होणार्या वारकर्यांची संख्या दीडपट असेेल, असा अंदाज प्रशासनाचा आहे. वारीमध्ये मोबाईल नेटवर्क जाम होऊन संवाद होत नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे.
हेही वाचा