पुणे

मद्यप्राशन करून पूजा चव्हाण ने केली आत्महत्या

backup backup

पुणे : पुढारी ऑनलाईन;  टिक टॉक स्टार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याशी कथित संबंध असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे. मृत्यूनंतर व्हिसेरा अहवाल आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.

माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारी, २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

तिच्या आत्महत्येनंतर वनमंत्री राठोड यांच्या संबंधाचे अनेक पुरावे व्हायरल झाले. त्यांच्यातील संभाषणाच्या क्लिपही व्हायरल झाल्या होत्या.

त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या घरच्यांनी राठोड यांना क्लिन चीट दिली होती. मात्र, पोलिस तपासातून अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्या असता त्यातील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाबी

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर व्हिसेरा अहवाल आला आहे. या अहवालात तिच्या मानेला जबर मार लागला होता.

तिच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा अंश आढळला आहे. ही बाब केमिकल अँनालायसेस अहवालात नोंद करण्यात आली आहे.

व्हिसेरा अहवालानुसार पूजाने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचे यावरून निष्पन्न झाले आहे.

दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी तिचे आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता. पुणे पोलिसांनी त्याला दुजोरा दिला असल्याने राठोड अडचणीत आले होते.

आत्महत्येपूर्वी ९० मिनिटे संभाषण

आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाले होते. हा कॉल रेकॉर्ड झाला होता. पूजाच्या आत्महत्येनंतर हे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले होते.

मंत्री राठोड यांना द्यावा लागला होता राजीनामा

पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर दररोज एक क्लिप व्हायरल होत होती.

तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील क्लिप कशा व्हायरल होत होत्या याचा अंदाज कुणालाच लागत नव्हता.

पण पद्धतशीरपणे या क्लिप व्हायरल होत होत्या. पूजा चव्हार ही राठोड यांच्या अगदी निकट होती.

आत्हमत्येपूर्वी तिचा गर्भपातही करण्यात आल्याचे संभाषणातून स्पष्ट होते.

राठोड या संभाषणामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले होते.

मात्र, विरोधकांनी राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशन चालूच देणार नाही असा पवित्रा घेतला आणि राठोड यांनी राजीनामा दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT