पुणे

भ्रष्टाचार : मेडिकल बिलासाठी लाच घेताना शाखाधिकाऱ्यासह एकावर गुन्हा

अनुराधा कोरवी

बारामती; पुढारी वृत्तसेवा: मेडिकल बिलासाठी लाच घेताना (भ्रष्टाचार) शाखाधिकाऱ्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती येथे मेडिकल बिल मंजूर करून देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांच्या लाच मागितली होती.

या प्रकरणी जलसंपदाच्या शाखाधिकाऱ्यासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

भिमा उपसा सिंचन शाखाधिकारी संजय नारायण मेटे (वय ५२, रा. आर्या सोसायटी, संघवीनगर) आणि पोपट दशरथ शिंदे (वय ५८, रा. सहयोग सोसायटी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

भीमा उपसा सिंचन कार्यालयात काम करणाऱ्या संजय भिकुलाल पवार यांनी याबाबत फिर्याद दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंके व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

मेडिकल बिल मंजूर करून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी

संजय नारायण मेटे हे पळसदेव (ता. इंदापूर, जि.पुणे) येथे भिमा उपसा सिंचन शाखाधिकारी पदावर कार्यरत होते. आपल्याच कार्यालयातील संजय पवार (५७ वर्ष) याच्याकडे मेडिकल बिल मंजूर करून देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तसेच ही लाच संजय मेटे यांनी स्वत: न घेता एका खासगी व्यक्ती पोपट दशरथ शिंदे यांच्याकडे द्यायला सांगितली. ही घटना रविवारी (दि. ८) सायंकाळी बारामतीतील संघवीनगरमध्ये घडली. या घटनेची पडताळणी एसीबीकडून करण्यात आली. एसीबीने चतुराईने मेटे शाखाधिकाऱ्यांसह साथीदाराला पकडण्यात यश आले.

हेही लाचलंत का? 

पाहा : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची 'फोनाफोनी'!!

SCROLL FOR NEXT