पुणे

फांद्यांऐवजी मुळासकट झाडे तोडणार्‍यांवर कारवाई

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: वेल्हे-आंबवणे रस्त्यावरील धोकादायक झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी चांगली झाडे मुळासकट तोडणार्‍या ठेकेदारांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. हा प्रकार वेल्हे तालुक्यातील आंबवणे ते करंजावणे यादरम्यानच्या मुख्य वेल्हे रस्त्यावर उघडकीस आला.

याबाबत शिवसेनेचे वेल्हे तालुकाप्रमुख दीपक दामगुडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वादळी पावसात झाडे कोसळून दुर्घटनांची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने धोकादायक फांद्या व निकामी झाडे काढण्याचे काम एका ठेकेदाराला दिले. धोकादायक असलेल्या वाळलेल्या फांद्या काढण्याऐवजी प्रत्यक्षात चांगलीच मोठी झाडे तोडण्यात आली.

ठेकेदाराने रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा करणार्‍या झाडाच्या धोकादायक फांद्या, झुडपे काढली आहेत. मात्र, त्याचबरोबर चांगली झाडेही काढली आहेत. त्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

– संजय संकपाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, वेल्हे विभाग

हेही वाचा

SCROLL FOR NEXT