नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुरंदर तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सोहळा 24 आणि 25 जून रोजी सासवडला मुक्कामी येत असून झेंडेवाडी ते निरापर्यंत येणार्या सर्व गावांत पंचायत समिती पुरंदर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधा देण्यासाठी सेवा पथके सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली.
या सोहळ्यासाठी 148 कर्मचारी तैनात असून यात एक तालुका अधिकारी,10 वैद्यकीय अधिकारी, 30 समुदाय अधिकारी, 30 कर्मचारी, 40 आरोग्य सेविका, चालक, शिपाई तसेच इतर तालुक्यातून येणारे काही आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक यांचा समावेश आहे.
आरोग्य केंद्राची 5 वहाने आणि सासवड व जेजुरी नगरपालिकेची 2 वाहने पालखी सोबत असतील.
तर 108 नंबरच्या अॅम्बुलन्स या सासवड, जेजुरी व नीरा या ठिकाणी उपलब्ध असतील. 5 ठिकाणी लसीकरण केंद्र व ह्दयविकारासाठीची अॅम्बुलन्स यांचा समावेश असेल. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, पुरंदर पंचायत समिती गटविकास अधिकारी अमर माने यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडेवाडी ते निरा तयारी पुर्ण झाली आहे. सर्व विभाग कामाला लागले आहेत.
हेही वाचा