शेळगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे सोमवारी (दि. 13) गोतोंडी (ता. इंदापूर) येथे आगमन होताच गोतोंडी ग्रामस्थ व माऊली शंकरराव पाटील कुटुंबीयांच्या वतीने अश्वाची पूजा करण्यात आली. या वेळी भाविकांनी अश्वदर्शनासाठी गर्दी केली होती.
पालखीचे अश्व श्री क्षेत्र देहूकडे (पुणे) मार्गस्थ झाल्यानंतर सोमवारी सकाळी गोतोंडी येथील माऊली पाटील यांच्या वस्तीवर सालाबादप्रमाणे आल्यानंतर अश्वाचे पूजन करण्यात आले. सोमवारी (दि. 20) अश्व देहूला दाखल होणार आहेत, असे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार हभप निवृत्ती महाराज गिराम यांनी सांगितले. या प्रसंगी माऊली शंकरराव पाटील, गावकामगार तलाठी बाळासाहेब तांबिले, यशवंत पाटील, अमोल पाटील, अशोक पाटील आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.