पुणे

पिंपरी येथे निलंबित पोलिसावर जीवघेणा हल्ला

रणजित गायकवाड

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : निलंबित पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे.

मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केल्याचा राग मनात ठेवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने निलंबित पोलिसावर जीवघेणा हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर तुकाराम सोनके (४१, रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अनिकेत हेमराज वाणी (२१, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), सुरज खिल्लारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा :

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनके हे सध्या चंदन नगर पोलिस ठाणे असून एका प्रकरणात ते निलंबित झाले आहेत.

मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक दिघी येथून चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपींचे टोळके आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले.

अधिक वाचा :

त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली.

आरोपी अनिकेत वाणी याला फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते.

त्याचा राग ठेवून फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सोनके हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवत तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे तपास करीत आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT