पुणे

टाकळी हाजी परिसरात दमदार पाऊस; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस

अमृता चौगुले

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील टाकळी हाजी येथे पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. सोमवारी (दि. 13) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर अधिक असल्याने आणि वारा नसल्याने काही क्षणातच सगळीकडे पाणी-पाणी झाले.

टाकळी हाजी, म्हसे, माळवाडी या परिसरातही पावसाची जोरदार हजेरी लागली. पावसाने असह्य उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली, तर शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांची थोडीफार धांदल उडाली. या पावसामुळे राबणारा शेतकरी किमान काही काळ तरी घरात विसावणार आहे. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह झालेला हा पाऊस एकंदरीतच समाधानाचा असल्याचे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे यांनी सांगितले.

टाकळी हाजी, म्हसे, माळवाडी येथील घोड नदीवरील बंधार्‍यातील पाणी संपल्याने पाण्याचा तुटवडा भासू लागला होता. परंतु पावसामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला असल्याचे मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT