घोड धरणाचा उपयुक्त पाणीसाठा संपला | पुढारी

घोड धरणाचा उपयुक्त पाणीसाठा संपला

निमोणे, पुढारी वृत्तसेवा: शिरूर-श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणाचा उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे या धरणावरील लाभक्षेत्राची सगळी भिस्त आता पावसावर अवलंबून आहे. शिरूर, श्रीगोंदा व कर्जत या तिन्ही तालुक्यांतील 20 हजार हेक्टर झेत्र हे घोड धरणाच्या लाभक्षेत्रात येते.

मागील वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे खरीप व रब्बी हंगामामध्ये दोन्ही कालव्याद्वारे आवर्तने सोडण्यात प्रशासनाला कोणतीही अडचण जाणवली नाही. मात्र मागील पाच- दहा वर्षांपासून जून महिन्यात घोडच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच होत नसल्याने जून ते ऑगस्ट महिन्यात धरण मृत साठ्यातच राहते.

घोड धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाची सरासरी ही कायम नीचांकी राहत असल्यामुळे उन्हाळ्यात नव्हे तर ऐन पावसाळ्यात लाभक्षेत्रात पाण्यासाठी शेतकर्‍यांना कायम झोंबी खेळावी लागते. दरम्यान घोडच्या मृत साठ्यातून पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम देऊन नंतरच शेती व उद्योगासाठी पाण्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती घोड धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा

वडिलांचा पबजीला नकार; तरुणाने केली आत्महत्या

राज्यात ३१७ कोटींच्या वीज चोर्‍या पकडल्या

कोल्हापूर : माथाडी कामगारांच्या काम बंदमुळे कांदा मार्केटमधील उलाढाल ठप्प

Back to top button