रावणगाव : पुढारी वृत्तसेवा: महावितरण कंपनीच्या खांबांमधील अंतर जास्त असल्याने रावणगाव (ता. दौंड) येथील रांधवण वस्ती परिसरातील झोळ पडलेल्या तारांमध्ये विद्युत खांब टाकण्याचे काम वीज वितरण कंपनीने तातडीने केले. याबाबत दै. 'पुढारी'त शुक्रवारी (दि. 17) सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीने त्याची तातडीने दखल घेत विद्युत खांब टाकून दिले.
तसेच झोळ पडलेल्या तारांना प्रेशर बसवल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. परिसरात अनेक ठिकाणी खांबांचे अंतर जास्त असल्याने तारांना झोळ पडून विद्युत घर्षण होऊन ऊस पिकाच्या नुकसानीबरोबर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. येथील जागृत वीज ग्राहक पद्माकर कांबळे यांनी याबाबत महावितरण कंपनीशी वारंवार संपर्क साधूनही काम होत नसल्याने संताप व्यक्त केला होता. आज झालेल्या तातडीच्या कामाने त्यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा