पुणे : पुढारी वृत्तसेवा
खुनाचा प्रयत्न, जवळ हत्यार बाळगणे, मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सराइताला गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने शहरात फिरत असताना अटक केली. नाना पेठ येथे आईला भेटण्यासाठी आला असता त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
गणेश बाळकृष्ण अडागळे (नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अडागळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत 7 गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याला पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे. युनिट-1चे पथक हद्दीत गस्त घालत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अंमलदार इम—ान शेख, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.