Escaped Accused from Yerwada Police Station Arrested Pudhari
पुणे

Pune Crime : येरवडा पोलिस ठाण्यातून पसार झालेल्‍या आरोपीला बेड्या

लॉकअपच्‍या स्‍वच्‍छतागृहातील काचा उचकटून झाला होता पसार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीतून (लाॅकअप) पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. लॉकअपमधील स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी पसार झाला. पोलिसांनी तातडीने तपास करून पसार आरोपीला येरवड्यातून अटक केली. शैलेश राजू माेहिते (वय १९, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याला अल्पवयीन युवतीवर बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करून त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

रविवारी (दि.८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहितेने काेठडीत अंथरण्यासाठी चादर हवी आहे, असा बहाणा केला. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून तो स्वच्छतागृहात केला. स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा सरकवून उतरला आणि पसार झाला. काही वेळानंतर मोहिते पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोहिते याला येरवडा परिसरातून रात्री दहाच्या सुमारास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT