पुणे

रामवाडी ते पुणे विमानतळ कनेक्टिव्हिटी मिळणार का? : पुणेकरांचा सवाल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांतच मेट्रोचा तिसरा टप्पा म्हणजेच रूबी हॉल ते रामवाडी मार्ग पुणेकर प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे रामवाडी येथून पुणे विमानतळाला कनेक्टिव्हिटी मिळणार का? असा सवाल पुणेकर प्रवाशांकडून केला जात आहे.
मेट्रोच्या आराखड्यामध्येच मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी पुणे विमानतळाला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता मेट्रो लोहगाव विमानतळाच्या अलीकडे असलेल्या रामवाडीपर्यंत धावणार आहे. मेट्रोची थेट कनेक्टिव्हिटी पुणे विमानतळाला असावी, अशी अनेक पुणेकर प्रवाशांची मागणी आहे. मात्र, तसे होण्यास आता आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

बस कुठे थांबणार : प्रवाशांचा प्रश्न
मेट्रोच्या येरवडा स्थानक, रामवाडी स्थानक येथून पीएमपीच्या बस गाड्यांची कनेक्टिव्हिटी कशाप्रकारे असणार, त्यांची वारंवारिता कशी असणार, प्रवाशांना बस बदलायची आवश्यकता असणार का? येथे बस कोठे थांबणार असाही प्रश्न पुणेकर प्रवाशांना पडला आहे.

तिसर्‍या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर विमानतळाला पीएमपीची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. दोन एसी बसमार्फत ही सेवा पुरविली जाईल. यासंदर्भात पीएमपी अधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे.

– हेमंत सोनावणे,

कार्यकारी संचालक, महामेट्रो मेट्रोने तिसर्‍या टप्प्यातील मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पीएमपीची फीडर सेवा आम्हाला मिळेलच, मात्र, थेट मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे आम्हाला नक्कीच फायदा होणार असून, वारंवार बस बदलण्याची गरज भासणार नाही.

– आकाश पानसरे, प्रवासी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT