पुणे

कार्ल्यातील भाजे धबधबा गजबजला

अमृता चौगुले

कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सलग सुट्या आल्याने कार्ला परिसरातील भाजे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
कार्ला भाजे, पाटण, वेहरगाव व परिसर भागात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वर्षाविहारासाठी पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणात वळल्याने गर्दी झाली. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात पर्यटकांचा ओढा वाढला आहे. कार्ला एकवीरादेवी मंदिर, भाजे येथील भाजे व कोंडीचा धबधबा, पाटण येथील धबधबा व किल्ले लोहगड, विसापूर किल्ल्यावर भटकंती करण्याची पर्यटकांची संख्या वाढली आहे. निसर्गाच्या सानिध्यात वर्षाविहाराचा आनंद घेताना पर्यटक दिसत होते.

परिसरातील निसर्गसौंदर्य भाजे लेणी, लोहगड किल्ला, पवना धरण पाहण्यासाठी मळवली रेल्वे स्टेशनवर पर्यटकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढत असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश माने, भारत भोसले यांनी नियोजन केले होते. भाजे धबधब्याकडे जाणार्‍या मोठ्या वाहनांना थांबवून पर्यटकांना चालत जाण्यास सांगितले जात होते. तसेच, लोणावळा-पुणे लोकललादेखील गर्दी वाढल्याचे दिसून आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT