प्रदीप बलाढे
वारजे: वारजे-पॉप्युलरनगर प्रभागात (क्र.32) महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला शिवणे परिसर जोडण्यात आला आहे. गेल्या काळात या प्रभागावर राष्ट्रवादी काँग््रेासचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण आणि पक्षांतरामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपने बाजी मारली.
या प्रभागात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग््रेासचे वर्चस्व आहे. प्रभागात 82 हजार 537 मतदार असून, यात नऊ हजार 982 अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील मतदारांचा समोवश आहे. यामुळे ’अ’ गटाची एक जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली होती. तसेच ’क’ गटातून (सर्वसाधारण) दिग्गज महिलांना एकमेकांसमोर निवडणूक लढवावी लागली. राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेविका व माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची उमेदवारी निश्चित असताना भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचे पुतणे भारतभूषण बराटे, माजी नगरसेविका सायली वांजळे यांना भाजपत घेऊन पक्षाने विजयाची मोट बांधली. निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केल्याचा फायदा देखील भाजपला या निवडणुकीत झाला.
सायली वांजळे यांच्या भाजपप्रवेशामुळे नाराज झालेल्या रोहिणी वासुदेव भोसले यांच्या सुनबाई हर्षदा भोसले यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून (अ गट) उमेदवारी देण्यात आली. भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग््रेासची उमेदवारी मिळवली. तसेच काँग््रेासचे सचिन बराटे यांनी देखील राष्ट्रवादी काँग््रेासकडून उमेदवारी मिळवित निवडणूक लढविली.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रभागात सभा घेतल्या. तसेच राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा व रॅली, तसेच खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांची रॅली झाल्याने राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी काँग््रेासचे चारही नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांना दोन क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग््रेासला नाकारून भाजपला साथ दिली.
‘अ’ गटातून भाजपच्या हर्षदा भोसले यांना 26 हजार 310 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या अश्विनी कांबळे यांनी 8 हजार 248 मते घेतली. ‘ब’ गटातून भाजपचे भारतभूषण बराटे यांना 34 हजार 198 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार किरण बारटक्के यांना 9 हजार 171 मते मिळाली. ‘क’ गटातून भाजपच्या सायली वांजळे यांना 23 हजार 311 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या दीपाली धुमाळ यांना 8 हजार 998 मते मिळाली. ‘ड’ गटातून भाजपचे सचिन दोडके यांना 31 हजार 243 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे सचिन बराटे यांना 10 हजार 740 मते मिळाली.
आमदार तापकीर प्रचारासाठी फिरकलेच नाहीत
या प्रभागात इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर हे नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे ते भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभागात एकदाही फिरकले नाहीत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सभेला देखील ते उपस्थित नसल्याचे दिसून आले होते.