वेल्हे: राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी सोमवारी (दि. 12) राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल बुद्रुक येथील मावळातीर्थावर मावळ्यांचा जनसागर लोटला होता. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, तुतारी, ढोल ताशांचा गजर, व्याख्याने, पोवाडे आणि पालखी सोहळ्याने राजगडाची दरी-खोरी दुमदुमून गेली होती. विविध खात्यांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुणे, राजगड, तोरणा, सिंहगड भागासह राज्यभरातील शेकडो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. मावळा जवान संघटना व अठरापगड मावळ्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती शिल्पाचे अनावरण ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, राजगडचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते मानाची पूजा करण्यात आली.
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, सुरेश मोहिते, संजय कंक, जयेश गायकवाड, सचिन भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, राष्ट्रवादी काँग््रेासचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, शंकरराव भुरुक, तानाजी मांगडे, अप्पासाहेब आखाडे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ, वनिता गोरड, बाळासाहेब भरम, गंगाराम शिर्के, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील यावेळी उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी सोहळ्याची माहिती दिली. प्रा. दादासाहेब कोरेकर व ओंकार यादव यांच्या व्याख्यानाने शिवकाळ जागा झाला. रायरेश्वराचे शिवाचार्य सुनील स्वामी जंगम यांनी शिव-जिजाऊ वंदना दिली. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात शिवभक्तांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी न्हावरे (ता. शिरूर) येथील पद्मावती कोरेकर यांना राष्ट्रीय राजमाता गौरव पुरस्कार, धायरी येथील पंढरीनाथ पोकळे यांना राष्ट्रीय मावळाभूषण पुरस्कार, भोर येथील रमेश बुदगुडे यांना छत्रपती शिवाजी महाराज समाजरत्न पुरस्कार, दासवे येथील विष्णू मोरे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार व पौड येथील विनायक गुजर यांचा छत्रपती राजाराम महाराज गौरव पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू पुरस्काराने सूरज आवाळे, आदर्श ग््राामविकास अधिकारी पुरस्काराने नितीन ढुके, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार भरत शेंडकर, आदर्श शिक्षक पुरस्कार रमेश टकले, संतोष नवले, विकास गायकवाड, ज्योती दीक्षित व तानाजी तारू यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संघटनेचे कार्यवाह रोहित नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप खाटपे, संजय भिंताडे, तानाजी मरगळे, संतोष वरपे यांनी केले. संयोजन संघटनेचे संघटक संतोष चोरघे, हनुमंत दिघे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, शहराध्यक्ष पप्पू गुजर, लक्ष्मण करंजकर, संदीप मालुसरे, गोरख लायगुडे आदींनी केले.