बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती- भिगवण रस्त्यावर येथील विद्या काॅर्नर चौकात डंपर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन युवक ठार झाले. एका युवकाने प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने तो आश्चर्यकारकरित्या बचावला. प्रतिक विजय भोसले (वय २०) व निखिल सौताडे (वय २०, दोघे रा. दुधोडी, ता. कर्जत, जि. नगर) हे युवक ठार झाले. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, निखिल सौताडे हा भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. व त्याने ऑनलाईन मोबाईल मागवला होता. हा मोबाईल पार्सलने आला होता. तो मोबाईल घेण्यासाठी तिन्ही मित्र मोटरसायकल वरून निघाले होते. त्याच वेळेस बारामती बाजूकडून आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या डंपरसमोरच दुचाकी आल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मोटरसायकलवर असलेले तिघे एकमेकांचे मित्र होते. यामध्ये प्रतीक विजय भोसले हा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. हे तिघे एकाच रूमवर वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये प्रतीक भोसले व निखिल अवताडे यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे ते या अपघातात ठार झाले. दोन्ही युवकांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. निखिल सौताडे हा आपल्या आईला बारामतीत दवाखान्यात घेऊन आलेला होता व बुधवारी तो पुन्हा गावी परत जाणार होते. त्याचे नुकतेच लग्न ठरलेले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.
या अपघातानंतर अपघातातून बचावलेल्या संदेश कुंभार याला देखील कमालीचा मानसिक धक्का बसला होता. अपघातानंतर या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.