पुणे

पुणे : बाल आशा घरातून २६ जानेवारीला निघून गेलेले तिघे सापडले

अमृता चौगुले

पौड : पुढारी वृत्तसेवा

आंबवणे (ता. मुळशी) येथील बाल आशा घरातून पाच अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. यापैकी तीन मुलांना शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आशा बालघरच्या कर्मचाऱ्यांना यश आले असल्याची माहिती पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

श्रीपत लहू मोरे (वय ११, रा. जवळगाव, ता. मुळशी, गणपत भूरिया उघडे (वय ११, रा. खंडाळा, ता. मावळ) आणि आलू उर्फ सागर सुदाम वाघमारे (वय ११, रा. साठेसाई, ता. मुळशी) हे तिघे चिखलगाव दूर्गेवाडीतील कातकरी वस्तीत मिळून आले आहेत. मात्र आणखी दोन मुले बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मनोज सदाशिव गवळी (वय ३६, धंदा नोकरी, सध्या रा. नांदगांव, पो. आंबवणे, ता. मुळशी, मुळ रा. चाळीसगांव) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

आंबवणे गावात संपर्क बाल आशाघर आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पाच मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली होती. पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, बाल आशाघरचे संस्थापक अमित बँनर्जी, नियोजन समिती सदस्य अमित
कंधारे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक विठ्ठल पडवळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, बीट अमंलदार मुजावर, देवघरचे पोलिस पाटील विजय हुंडारे, आंबवणेचे पोलिस पाटील गणेश दळवी हे देखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT