पुणे

लोकांच्या भावना भडकाविणाऱ्यांना अटकाव घातला पाहिजे : अजित पवार

backup backup

सुपे, पुढारी वृत्तसेवा : "एसटीच्या विलिनीकरणाच्या प्रश्‍नात चिथावणीखोर भाषणामुळे लोकांच्या भावना भडकावून समाज विघातक कृत्यांना खतपाणी घातले आहे. समाजामध्ये तेढ निर्माण झाली तर वातावरण बिघडते. आकसाची भावना निर्माण होते, त्याला अटकाव घातला पाहिजे", असे मत अजित पवार यांनी व्‍यक्‍त केले. बारामती तालुक्यातील सुपे येथील ४ कोटी ९० लाख खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी आयोजित कार्यक्रमात ते होते.

या वेळी पवार म्हणाले की,"कोरोना काळात अडचणीला सामोरे जावे लागल्यामुळे महाराष्ट्राला आर्थिक अरिष्टाला तोंड द्यावे लागले. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. या भागातून बऱ्याच दिवसांपासून बस सेवेची मागणी होत होती पीएमपीएलला ७० कोटी रुपयांचा तोटा झाला असून, इलेक्ट्रिक बस व चार्जिंग स्टेशन वाढवून तसेच पिंपरी चिंचवड ,पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे."

सुपे गावातील ग्रामस्थांच्या एकोप्याचा भावनेतूनच व सर्वांचा विश्वासातूनच सुपे ग्रामपंचायत नगरपंचायत करण्याचा निर्णय घेऊ ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद व हेवेदावे नसावेत, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

या वेळी सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे ,सचिन सातव, संदीप जगताप, पुरुषोत्तम जगताप, नीता बारवकर ,शौकत कोतवाल, संपत जगताप हे उपस्थित होते. यावेळी सुयश जगताप महेश चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा .अनिल धुमाळ, अशोक लोणकर यांनी तर आभार अशोक लोणकर यांनी मानले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT